Posts

बालवाडीतील गणित

बालवाडीत येणार्‍या मुलांसाठी गणिताचा कार्यक्रम आखताना सामान्यपणे अंक परिचयावर व पाठांतरावर भर देण्यात येतो. पालक, शिक्षक या दोघांच्याहीकडून मुलांनी अंकचिन्ह लक्षात ठेवणे व उजळणी म्हणणे, अशा अपेक्षा असतात. मात्र गणितातील संकल्पना समजणे, तर्क करण्याची क्षमता विकसित होणे, यांवर फारसे लक्ष दिले जात नाही. खरे तर गणित शिक्षणात, निदान बालवाडीच्या तरी, संकल्पना स्पष्ट होणे व तर्कसंगत विचाराला सुरूवात होणे, यांवर भर असायला हवा. लहान मुलांची विचार करण्याची पद्धत मोठ्या माणसांपेक्षा गुणात्मकदृष्ट्या वेगळी असते. आपल्याला सहज वाटणार्‍या गोष्टी अनेकदा मुलांना पटत नाहीत म्हणून मुले अनेकदा आपल्याला तर्कविसंगत वाटणारी उत्तरे देतात. मुलांच्या विचारातील ही विसंगती दूर होण्यासाठी त्यांना मूर्त पातळीवर योग्य अनुभव मिळणे गरजेचे आहे. अनुभवाच्या जोडीला योग्य अशी भाषा वापरली गेली म्हणजे हळूहळू तर्कसंगत विचार करणे मुलांना जमू लागते. या अभ्यासक्रमाची रचना करताना मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीवर भर देण्यात आला आहे. पाठांतरापेक्षा, लक्षात ठेवण्यापेक्षा, प्रत्यक्ष करून समजून घेण्याच्या आणि समजून वापरून...