Posts

मुलांचे गणित शिक्षण : काही अनुभव

Image
महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यात डहाणू हा आदिवासी - बहुल तालुका आहे ,  या तालुक्यातील ऐने या गावात ग्राममंगल या संस्थेची आदिवासी मुलांची शाळा आहे या शाळेतील मुलांना गणित शिकवण्याची संधी मला मिळाली .  सुमारे तीन ते साडेतीन वर्षे मी मुलांना गणित शिकवले .  ही मुले बालवाडीत ते चौथी या वर्गातली होती .  माझे नियमितपणे गणित शिकवणे बंद झाल्यानंतरही इतर शिक्षकांना मदत करण्याच्या निमित्ताने माझा ‘गणित शिक्षणाशी’ संबंध येतच राहिला .  मी काही प्रशिक्षित गणित शिक्षक नाही .  त्यामुळे आदिवासी मुलांनी गणित शिकवायला सुरुवात केल्यानंतरच माझे गणिताच्या शिक्षणाबाबतचे वाचन सुरू झाले .  माझ्या लक्षात आले की ‘गणित शिक्षण’ ,  त्यातूनही लहान मुलांचे गणित शिक्षण या विषयात जगभरात खूपच संशोधन झालेले आहे .  गणित शिकताना मुलांच्या संकल्पना कशा विकसित होतात ,  गणित शिकताना त्यांना कोणत्या अडचणी येतात ,  यासंबंधीची बरीच माहिती मला माझ्या वाचनातून मिळाली .  सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात आली की ही की बर्‍याच मुलांना गणिताची नावड निर्माण होण्याचे कारण त्यांची गणित शिक्षणाची पद्धत आहे .  गणित जर योग्य पद्धतीने शिकल